बातम्या

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वबळावर, एकूण ५ जागा लढवणार

सकाळ न्यूज नेटवर्क

सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष स्वबळावर लढणार असून, महाराष्ट्रातील औरंगाबाद, सिंधुदुर्ग-रत्नागिरी, ईशान्य मुंबई, ठाणे, अमरावती या पाच जागा पक्षाकडून लढल्या जातील. भाजप, शिवसेना पक्षातील नाराज नेतेमंडळी आमच्या पक्षात यायला इच्छुक असून, त्यांचा विचार त्या जागांसाठी केला जाईल, अशी माहिती नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पक्षबांधणी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर नितेश राणे शनिवारी सोलापुरात आले होते. त्यावेळी ते म्हणाले, पाकिस्तानबद्दल भारतीयांची विश्‍वासार्हता संपली आहे, त्याप्रमाणे शिवसेनेची विश्‍वासार्हता संपली आहे. टोकाची टिका करुनही शिवसेनेने भाजपसमवेत युती केली. परंतु, जनता मूर्ख नाही आणि तसे शिवसेनेने समजूही नये. शेतकरी, कामगारांचे प्रश्‍न आणि मराठा, धनगर, मुस्लीम समाजासह अन्य समाजाच्या आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावर आपला फोकस असेल.

आता राम मंदिराचा प्रश्‍न बाजूला पडला असून पाकिस्तानवर एखादी कारवाई केली की, जनता आपोआप मतदान करेल, असे सत्ताधाऱ्यांना वाटत असल्याचेही ते म्हणाले. यापुढे आमच्या पक्षाचे राज्यभर मेळावे होतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

ठळक बाबी...

- महाआघाडीचा पहिला मेळावा नांदेडमध्ये हेच दुर्दैव. 
- आगामी निवडणुकांमध्ये सोशल मिडियाचा सर्वाधिक वापर होणार 
- काँग्रेसने कामे खूप केली. परंतु, मार्केटिंगमध्ये पिछाडीवर 
- पाकिस्तानला मैदानात लोळवा, त्यांच्या खेळाडूंचे चेहरे पाहायला भारतीयांना आवडेल. 
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ फसवे 
- तरुणांना कर्ज नाकारणाऱ्या बॅंका फोडाव्या लागतील 

मनसे फक्‍त यू-टर्न पुरती मर्यादित

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे नेते म्हणून खूप चांगले आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांसाठी अथवा संघटना बांधणीसाठी वेळ द्यायला हवा होता. परंतु, शिवाजी पार्क आणि दादर यापुरतीच मनसे मर्यादित राहिली. त्याच परिसरात त्यांची गाडी यू-टर्न घेते, असा टोला नितेश राणे यांनी यावेळी लगावला.

सुशीलकुमार शिंदे मार्केटिंगमध्ये कमी पडले

दहशतवादी अजमल कसाबला फाशी दिल्याची मोठी घटना होती. त्याचे मोठे मार्केटिंग करता आले असते. परंतु, तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तसे केले नाही. भाजपच्या तुलनेत काँग्रेसने खूप कामे केली असतील. मात्र, भाजपने मार्केटिंगवर सर्वाधिक भर दिला. प्रत्येक सरकारची रणनिती वेगळी असते, असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

Web Title: Maharashtra Swabhimani will contest Five seats of Lok Sabha Election

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

400cc चे पॉवरफुल इंजिन, स्टाईश लूक; Bajaj Pulsar NS400 पुढील आठवड्यात होणार लॉन्च

Today's Marathi News Live: नरेंद्र मोदींनी 60 कोटी तरुणांना मुद्रा लोन दिलं; देवेंद्र फडणवीस

Madha Loksabha Election: देवेंद्र फडणवीस यांची आणखी एक खेळी, धवलसिंह मोहिते पाटील यांचा महायुतीला पाठिंबा

TRP Rating Of Marathi Serial : तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’चा टीआरपी घसरला; पहिल्या क्रमाकांवर कोणती मालिका?

Viral News: बायकोने नवऱ्याला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलं, केली धो-धो धुलाई; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT